You are currently viewing ग्रा.पं.निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची संख्या दोन अंकी असेल तर ५ हजार तीन अंकी असेल तर १० हजार रुपये बक्षीस – बाळा पावसकर

ग्रा.पं.निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची संख्या दोन अंकी असेल तर ५ हजार तीन अंकी असेल तर १० हजार रुपये बक्षीस – बाळा पावसकर

शिवसेनेवर टीका करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी कुडाळ मालवण तालुक्यात होऊ घातलेल्या १५ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत १२८ जागांपैकी मनसे पक्षाने किती उमेदवार दिले आहेत याचे आत्मपरीक्षण करावे. जर हि संख्या दोन अंकी असेल तर ५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल जर हि संख्या तीन अंकी असेल तर १० हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे जाहीर आवाहन शिवसैनिक बाळा पावसकर यांनी केले आहे.
बाळा पावसकर पुढे म्हणाले, राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची सिंधुदुर्गात संघटना नसून माहिती अधिकारातील ते एक टोळकं आहे अशी ओळख सिंधुदुर्गातील त्यांच्या नेत्यांनीच निर्माण केली आहे. मनसेचे नेते व पदाधिकारी इतर नेत्यांवर टीका करणे, माहिती अधिकाराचा गैरवापर करून अधिकाऱयांना ब्लॅकमिल करणे. खंडणी घेणे हेच काम करत आले आहेत. जेवढे अर्ज आजपर्यत त्यांनी माहिती अधिकारात दिले तेवढे जर निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरले असते तर मनसे पक्ष निवडणूक लढण्यायोग्य आहे असे मानले गेले असते.
कोणता उमेदवार निवडून द्यायचा हा मतदारांचा अधिकार आहे. परंतु निवडणुकीत उमेदवार उभे करणे हि पक्षाची जबाबदारी असते. परंतू मनसेने कुडाळ मालवण मधील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांची २ अंकी संख्या देखील पार केलेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कामात खो घालण्याचे काम मनसे करत आहे.त्यामुळेच मनसेच्या सोशल मीडिया फेम नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या आरोपांना शिवसेना प्रतिउत्तर देत नाही,आणि यापुढेही देणार नाही.अशी खोचक टीका बाळा पावसकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा