You are currently viewing माणुसकीचा जागर करणारे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन अभूतपूर्व उत्साहात संपन्न.

माणुसकीचा जागर करणारे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन अभूतपूर्व उत्साहात संपन्न.

*माणुसकीचा जागर करणारे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन अभूतपूर्व उत्साहात संपन्न.*

नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जाई फाउंडेशन, मुंबई महा. 49/2021 द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच, मुंबई यांचे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन विद्येचे माहेरघर पुणे येथे कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी व २२ जानेवारी २०२३ रोजी आझम कॅम्पस, असेंब्ली हॉल, छावणी परिसर, पुणे येथे अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाले.

 


या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिका अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका कवयित्री मा.आसावरी काकडे या अध्यक्षा तर 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. भारत सासणे सर उदघाटक म्हणून लाभले या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. पी. ए. इनामदार सर तर कार्याध्यक्ष म्हणून मा.मेहबूब कासार (राज्यकर उपआयुक्त वस्तू व सेवा कर विभाग,मुंबई), प्रमुख अतिथी म्हणून मा. रेश्मा घाणेकर मॅडम, (राज्यकर सहआयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, पुणे )तर समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मा. पुष्पराज गावंडे (सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ) तथा प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नामदेवराव जाधव, प्रा.नरेशचंद्र काठोळे,प्रा.सदाशिव शेळके यांची उपस्थिती लाभली.

या दोन दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, गझल मुशायरा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा असे दर्जेदार सत्रनिहाय मेजवानी आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन जमलेल्या साहित्यिकांची उपस्थिती या संमेलनास लाभली. समारोपीय सोहळ्यात वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा सर्व निमंत्रित कवींचा सत्कार करण्यात आला व पसायदानाने या संमेलनाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eight =