You are currently viewing लाखे वस्तीला निधी दिल्याबद्दल दीपक केसरकर यांचे मानले आभार…

लाखे वस्तीला निधी दिल्याबद्दल दीपक केसरकर यांचे मानले आभार…

सावंतवाडी

येथील लाखे वस्तीत उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी युद्धपातीवर काम सुरू झाले आहे. तर काही काम येणाऱ्या काळात सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे लाखे वस्ती शाखाप्रमुख अमित लाखे यांनी समाजाच्या वतीने आभार मानले. दरम्यान वस्तीतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी परिसरात वाचनालय सुद्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणीही त्यांनी श्री. केसरकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना श्री. लाखे म्हणाले, श्री. केसरकर यांनी लाखे वस्तीतील समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहे. वस्तीतील लोकांना घरे देण्याबरोबरच इतर सर्वच प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. त्यातच वस्तीतील रस्ता, गटारे, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व ड्रेनेजची समस्या आदींकडे श्री. केसरकर यांचे लक्षवेधी देण्यात आले होते. दरम्यान त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद करून काही दिवसांपूर्वीच भूमिपूजन सुद्धा केले होते. तर सद्यस्थितीत काही कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. तर अन्य कामे येत्या काळात पूर्ण करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वस्तीतील लोकांनी श्री. केसरकर यांचे आभार मानले आहेत. तर समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळत आहेत. मात्र त्यांच्यासाठी वाचनालय या ठिकाणी सुरू करण्यात यावे, तसेच वस्तीतील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मिळालेल्या घरांमध्ये जागा अपुरी पडत आहे. याकडे सुद्धा लक्ष देऊन येणाऱ्या काळात ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी श्री. केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 14 =