You are currently viewing क्रिकेट स्पर्धेत जुगाराचे पट

क्रिकेट स्पर्धेत जुगाराचे पट

*क्रिकेट सामन्यांच्या आडून सुरू जुगाराच्या मैफिली*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठया प्रमाणावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. शाळा कॉलेज बंद असल्याने बरीच मुले घरीच आहेत, त्यामुळे क्रिकेट सामन्यांना देखील बरीच गर्दी असते. सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात देखील दोन ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केले असून मोठ्या संख्येने तरुण वर्ग या सामन्यांमध्ये सामील झाला आहे.

क्रिकेट सामन्यांचे वातावरण निर्मिती म्हणजे मोठ्या आवाजात स्पीकर वर कॉमेंटरी. त्यामुळे सामने पाहणाऱ्यांना तिथे अवैध धंदे सुरू असतील याची कल्पना देखील येत नाही. क्रिकेट सामन्यांच्या आडून दोन्ही ठिकाणी जुगाराचे फड बसले असून क्रिकेट सामन्यांच्या आडून तरुण मुलांना जुगाराचे वेड लावण्याचे काम ही आयोजक मंडळी करत आहेत. स्पीकर वर क्रिकेटची कॉमेंटरी असल्याने प्रशासनाचा तिथे लक्ष जात नाही आणि स्थानिक खाकी वर्दीची मात्र भागवाभागवी केल्यामुळे जाणून बुजून स्थानिक बिट अंमलदार त्याकडे दुर्लक्ष करतो. येथे “आऊट” हे स्थानिक बिट अंमलदार आहेत, परंतु त्यांच्या अंमलातील हद्दीत क्रिकेटच्या आड सुरू असलेल्या जुगारांवर कृपादृष्टी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा