You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्ल्यू रिबन” पुरस्कार जाहीर…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्ल्यू रिबन” पुरस्कार जाहीर…

मनिष दळवींची माहीती; जून महिन्यात होणार लोणावळा येथे वितरण…

सिंधुदुर्ग

बँकिंग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा “बँको ब्ल्यू रिबन” हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर झाला आहे. लोणावळा येथे जून महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. बँकींग क्षेत्रात चांगले काम करून ग्राहकांना चांगली सेवा देणाऱ्या बँकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
जिल्हा बँकेने अनेक उपक्रमात व आर्थिक मापदंडात चांगले काम केले असून यावर्षीही हे सातत्य ठेवले आहे. बँकिंग क्षेत्रातील नवनवीन संकल्पना,अद्ययावत बँकिंग प्रणाली तसेच सहकार क्षेत्रातील विविध नियम आणि निकषांचे पालन करून सिंड्रोम जिल्हा बँकेने जिल्ह्यातील बँकिंग ग्राहकांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. व बँकिंग क्षेत्राचा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात शेतकरी व शेवटच्या वर्गापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे.पुढच्या काळातही हे क्षेत्र आणखी व्यापक करून बँकिंग क्षेत्र जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणखी पूरक ठरण्यासाठी बँक व्यवस्थापन आणि सर्व संचालक त्याला कटिबद्ध राहू,अशी ग्वाही या निमित्ताने श्री दळवी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा