You are currently viewing कासार्डे विद्यालयाचा अथर्व जोशी ज्युदो स्पर्धेत कोल्हापूर विभागात अव्वल

कासार्डे विद्यालयाचा अथर्व जोशी ज्युदो स्पर्धेत कोल्हापूर विभागात अव्वल

कणकवली

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, मार्फत आयोजित कोल्हापूर विभागीय सातारा पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्युदो खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.

२५ कि.ग्रॅम वजन गटात खेळताना इ.७ वी मधील कु.अथर्व अशिष जोशी याने कोल्हापूर विभागातील पाच जिल्हे(कोल्हापूर,सांगली,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) व तीन महानगरपालिकेतील (सांगली महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी महानगरपालिका) प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंवर मात करुन कोल्हापूर विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.
कु.अथर्व जोशी याची अमरावती येथे होणा-या शालेय राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तो वरील वजन गटातून कोल्हापूर विभागाचे नेतृत्व राज्यस्तरीय स्पर्धेत करणार आहे. याशिवाय३०कि.ग्रॅ.वजनगटातून इ.७वी मधील कु.अमोल दिपक जाधव या खेळाडुने याच स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील खेळाडूवर मात करीत द्वितीय क्रमांक, तर १९वर्षाखालील मुलींच्या गटातून खेळतांना इ.१२वी मधील विद्यार्थ्यिनी कु.संध्या सुरेश पटकारे हीने उपविजेतेपद पटकावले आहे. या दोन्ही खेळाडूंना विजेत्यापदाने थोडक्यात हुलकावणी दिली आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, ज्युदो प्रशिक्षक अभिजित शेट्ये,सोनु जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत खेळाडुंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी, शाळा समितीचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एस.सी. कुचेकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन करुन पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा