You are currently viewing एस.टी.सरळसेवा भर्ती कर्मचारी यांची सेवा स्थगीती रद्द…

एस.टी.सरळसेवा भर्ती कर्मचारी यांची सेवा स्थगीती रद्द…

एस.टी.सरळसेवा भर्ती कर्मचारी यांची सेवा स्थगीती रद्द….

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या मागणीस यश.

कुडाळ/ पूनम राटूळ :-

कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात महाराष्ट्राची जिवनवाहीनी एस.टी. व त्यावर अवलंबुन असणारे १लाख १० हजार कर्मचारी आर्थीक अडचणीत आले असतांनाच वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने, एस.टी. प्रशासनाने कर्मचारी कपात करण्याचे जाहीर केले होते.

याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने याबाबत माहीती घेऊन इ.स.२०१९च्या कर्मचारी सरळसेवा भर्ती कर्मचारी यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय होऊ नये म्हणुन या निर्णयाला विरोध करीत दि.२२जुन २०२० ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, परिवहन मंत्री अनिलजी परब तथा व्यवस्थापकिय संचालक शेखरजी चनै यांना याबाबत पत्र देऊन सेवा खंडीत बाबत आदेश रद्द करण्याची विनंती केली होती.

मात्र तरीही एस.टी प्रशासनाने दि.१७ जुलै ला २०१९च्या भर्ती मधील कर्मचारी यांना सेवा स्थगीतीचा आदेश पारीत केल्याने या निर्णयाविरोधात.तथा एस.टी.कामगारांच्या न्याय हक्कांसाठीच्या मागण्यांकरीता दि.२३ जुलै पासुन एस.टी.कामगारांचे महाराष्ट्र व्यापी स्वाक्षरी अभियान सुरु केले असुन या अभियानातील मुद्दा क्र.७ मध्ये कर्मचारी कपात निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

म.न.रा.प.का.सेनेच्या महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी अभियानाला एस.टी.कामगारांचा वाढता प्रतिसाद बघता एस.टी.प्रशासनाने स्वाक्षरी अभियानामधील, कोरोना विमा लागु करण्याचा तसेच दि.३ सप्टेंबर ला २०१९च्या सरळसेवा भर्ती कर्मचारी स्थगीती आदेश रद्द करण्याचा निर्णय म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण राज्यव्यापी स्वाक्षरी अभियान लढ्याचे फलित आहे. एस.टी.कामगारांवरील अन्यायाविरुध्द आवाज ऊठवण्याचे काम, लेखी निवेदने देण्याचे, पाठपुरावा करण्याचे काम सर्वप्रथम म.न.रा.प.का.सेनेनेच केले आहे. अशी माहीती म.न.रा.प.का.सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी व म.न.रा.प.का.से. उपाध्यक्ष, महाराष्ट्र, जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील २०१९च्या भर्तीमधील एस.टी.कामगार यांचेवरील अन्याय दुर झाल्याने सातत्याने शुभेच्छा देत आहेत अशी माहीती अध्यक्ष हरी माळी तसेच जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिली आहे. म.न.रा.प.का.सेनेच्या महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी अभियान या अभिनव आंदोलनाची महाराष्ट्रभर चर्चा होऊन स्वागत होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =