You are currently viewing कफल्लकाची दुनिया !

कफल्लकाची दुनिया !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कफल्लकाची दुनिया !*

 

मळलेली वाट तुडवली

पादत्राण कराकरं वाजलं

टकूर दगडावर आपटलं

दगडाला शेंदूर लागलं…!

 

बाहेर लख्ख उजेड

आत अंधार आहे

सोंगानीही पाठपुरावा सोडला

देवाला खुणावले आहे ..!

 

कधीच नाही देवा

यापूर्वी तुला खुणावले

उजळली कफल्लकाची दुनिया

घरमाझे कसे सापडले ..!

 

जगणं कफल्लकाच कळालं

जरा उशीरचं झाला

कशाला पसारा हवा

आव जगण्याचा आणला…!

 

उरलेत कांही क्षण

क्षणांची पुरचुंडी बांधली

चिमटीत पकडून त्यांना

कफल्लकाच्या स्वाधीन केली…!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 6 =