You are currently viewing हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व सी- आर्म मशीनचा लोकार्पण सोहळा

हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व सी- आर्म मशीनचा लोकार्पण सोहळा

हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व सी- आर्म मशीनचा लोकार्पण सोहळा

सिंधुदुर्गनगरी 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून प्राप्त हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व सी- आर्म मशीनचा मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे लोकार्पण सोहळा होणार आहे.

या सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफखासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, पंचायत समिती सभापती मिलींद नाईक यांची उपस्थिती लाभणार आहे.

 या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार,  वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषचे आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी केले असूननागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा