You are currently viewing भाजपाच्या वतीने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांचा ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

भाजपाच्या वतीने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांचा ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

*भाजपाच्या वतीने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांचा ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान*

*भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते सन्मान*

 

हिंदू संस्कृतीमधील स्त्रीचे स्थान हे उच्च दर्जाचे असून आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सामाजिक पिढी घडवण्याचं कार्य महिला करत असतात.आजी, पत्नी,सून, मुलगी,बहीण आणि इतर नाती जपत कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडताना औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी दिलेलं योगदान कधी विसरता नाही येणार नाही. भारतातील एकही क्षेत्र असे नाही की ज्यामध्ये महिलांचे योगदान नाही. असा कर्तृत्ववान महिलांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी सन्मान केला जातो. ज्या महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये लक्षवेधी काम केलं अशा नऊ महिलांचा सन्मान दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रणरागिणी पुरस्कार’ देऊन वेंगुर्ला येथील भाजप कार्यालयात महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अनाथ बालके व महिला सक्षमीकरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वांयगणी येथील सविता विश्वनाथ कांबळी, पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या खर्डेकर महाविद्यालय वनस्पती शास्त्र विभागप्रमुख डॉ.डी.एस.पाटील, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तुळस मधील सुजाता पडवळ, आशा स्वयंसेविका म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्षा विलास परब, यंत्र दुरुस्ती सारखा वेगळा मार्ग अवलंबून स्वतः रोजगार निर्मिती करून बेरोजगारांना एक प्रेरणा देणाऱ्या वजराट येथील करिष्मा चंद्रशेखर सोंनसुरकर, काळाच्या आड होत चाललेल्या हातमाग सारख्या व्यवसायिक कलेचे जतन आणि संवर्धन करून रोजगारासाठी कौटुंबिक हातभार लावणाऱ्या वजराट मधील शुभांगी सुधाकर सावंत-भोसले, बचत गटासाठी कार्य करणाऱ्या व योग प्रचार प्रसार करणाऱ्या रामघाट रोड येथील उर्वी उदय गावडे, कॅटरिंग व्यवसायातून व्यावसायिक संधी साध्य करणाऱ्या आणि मंगल कार्यालय चालवणाऱ्या अणसुर येथील पल्लवी राजेश गावडे, मानसिक आरोग्यावर कार्य करणाऱ्या सहज ट्रस्ट चे अध्यक्ष मीनाक्षी या विविध क्षेत्रांमधील नऊ कर्तुत्वान महिलांचा भाजपा च्या वतीने ‘रणरागिणी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , सरपंच संघटनेचे अध्यक्ष पपु परब , माजी सभापती सारिका काळसेकर , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , मा.उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर – प्रभुखानोलकर , महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर , नगरसेवीका – साक्षी पेडणेकर , श्रेया मयेकर , कृपा मोंडकर , ता.चिटणिस सुजाता देसाई , वृंदा मोर्डेकर , रसिका मठकर , अनु.जाती.मोर्चा जिल्हाध्यक्षा सोनीया मठकर , पाल सरपंचा कावेरी क.गावडे , पाल ग्रा.पं.सदस्या स्नेहल पालकर , खानोली सरपंचा प्रणाली खानोलकर , परबवाडा ग्रा.पं.सदस्या — कार्तिकी की.पवार व स्वरा देसाई , अंकीता देसाई , श्रद्धा धुरी ( रेडी ) , ज्ञानेश्वरी गावडे , पुजा तोरसकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडीस , शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे , सुभाष खानोलकर , सुनील घाग , वामन भोसले , सुनील मठकर इत्यादी उपस्थित होते .
यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्याची दखल घेतल्याबद्दल भाजपा चे आभार मानले.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =