You are currently viewing संत लालाजी मंडळ, मठ आयोजित दिपावली शो टाईमचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

संत लालाजी मंडळ, मठ आयोजित दिपावली शो टाईमचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला :

ग्रामीण भागातील मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी मठ येथील संत लालाजी मंडळ गेली १९ वर्षे सातत्याने ” दिपावली शो टाईम ” चे आयोजन करत आहे , ही बाब कौतुकास्पद असून हे मंडळाच्या कार्यकरर्त्यांचे यश आहे .असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले .

यावेळी व्यासपीठावर मठ सरपंच सौ. रुपाली नाईक , उपसरपंच बंटी गावडे , ग्रामपंचायत सदस्य संतोष वायंगणकर , भाजपा युवा नेते अजित नाईक , सामाजिक कार्यकर्ते दादा गावडे , जेष्ठ नागरिक दादा सावंत इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते .

दिनांक २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत संत लालाजी मंदिर – मठ , टाकयेवाडी येथे दिपावली शो – टाईम निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत .

आज झालेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत ४५ स्पर्धक सहभागी झाले होते . स्पर्धेचे परिक्षक म्हणून खडपकर सर व मिताली मातोंडकर यांनी काम पाहीले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार के.जी. गावडे यांनी केले .

यावेळी सचिन आईर , एकनाथ उर्फ बाळु भगत , चारुदत्त उर्फ विनायक जोशी , दिनेश परब , किशोर राणे , लक्ष्मी परब , सिद्धेश सावंत , शैलेश राणे , सुनील गावडे , दादा घाटकर , हरेश्वर परब , सुयोग जोशी इत्यादी मंडळाचे कार्यकर्त्ये उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा