जिल्हा परिषद निवासी संकुल रहिवाशी संघाकडून रक्तदान शिबिर संपन्न….

जिल्हा परिषद निवासी संकुल रहिवाशी संघाकडून रक्तदान शिबिर संपन्न….

नवरात्रोत्सव मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आले होते आयोजन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद निवासी संकुल रहिवाशी संघ, सिंधुदुर्गनगरी येथे दुर्गा देवी पूजन आणि रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात वीस रक्तदात्यानी रक्तदान केले आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश पालव, रक्तपेढी च्या दिपाली माळगावकर, वैद्यकीय अधिकारी हेमांगी रणदिवे, अधिपरिचारिका किशोर नांदगावकर, व इतर रक्तपेढी आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सहभागी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी कोणत्याही प्रकारे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले नाही आहेत. नवदुर्गाच्या कार्यक्रमानिमित्त शासनाच्या उपक्रमात थोडाफार हात लागावा या उद्देशाने मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष अशोक मराठे आणि कार्यकारिणी सदस्य सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर उपस्थितांचे आभार मानण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा