You are currently viewing महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद , जिल्हा सिंधुदुर्ग चा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पुर्णपणे पाठींबा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद , जिल्हा सिंधुदुर्ग चा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पुर्णपणे पाठींबा

समिल तकीलदार , जिल्हा *सचिव – शिक्षक परिषद सिंधुदुर्ग

कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात साईमंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षकांची सहविचार सभा आयोजित केली होती . यावेळी मार्गदर्शन करताना सलिम तकिलदार सर म्हणाले की राज्य कार्यकारिणी अध्यक्ष वेणुनाथ कडु सर यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे , त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक परिषदेचे शिक्षक हे १०० % ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठीशी उभे रहातील व म्हात्रे सरांना विजयी करुन शिक्षक परिषदेची ताकद दाखवून देतील असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव सलिम तकिलदार यांनी केले .
वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात शिक्षक परिषदेची वेंगुर्ले तालुक्याची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी व्यासपीठावर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी , उपाध्यक्ष अतुल काळसेकर , भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , शिक्षक परिषद वेंगुर्ले अध्यक्ष कीशोर सोन्सुरकर , सचिव सुनील जाधव , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद कांबळे सर , माजी मुख्याध्यापक एस् .एस् .काळे सर इत्यादी उपस्थित होते .
*कोकण शिक्षक मतदार संघातून खंडित झालेली विजयी परंपरा पुन्हा एकदा सुरू करा — अतुल काळसेकर*
मागच्या निवडणुकीत आपापल्या भांडणांमुळे कित्येक वर्षांपासूनचा परिषदेचा बालेकिल्ला ढासळला . त्यामुळे खरेतर शिक्षकांचे अतोनात नुकसान झाले . हि चुक सुधारण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना बहुमताने विजयी करुन , कोकण शिक्षक मतदार संघातील खंडित झालेली विजयी परंपरा पुन्हा एकदा सुरू करावी , असे आवाहन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले .
यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले . यावेळी विविध हायस्कूल चे शिक्षक तसेच महाविद्यालयाचे शिक्षक यांनी आपले विचार मांडले.
यावेळी शिक्षक परिषदेचे रमेश वाघमारे सर , अशोक काळे सर , पांडुरंग सामंत सर , डॉ.पी.आर.गावडे सर , सुनील गंगाराम जाधव सर , रवी विजय थोरात सर , सुरेखा शिंदे मॅडम , गोपीचंद बागुल सर , सविता जाधव मॅडम , एम् .एस् .काळे मॅडम , प्रा.जे.वाय.नाईक सर , रेक्ष्मा चोडणकर मॅडम , अक्षता पेडणेकर मॅडम , प्रा.वसंतराव पाटोळे सर , शरद आपटे सर , अजित नाईक सर , समिर पेडणेकर सर , अनिल गोवेकर सर , भाऊराव चाटसे सर , प्रा.डी.एस्.पाटील सर , व्ही.एस्.समुद्रे सर , पी.बी.वगरे सर , के.डी.खरबडे सर , स्वाती पोवार मॅडम इत्यादी ६५ शिक्षक उपस्थित होते.
यावेळी भाजपा पदाधिकारी – ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर व जगंन्नाथ राणे , शरद मेस्त्री , आत्माराम घाडी , पुंडलिक हळदणकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 7 =