You are currently viewing कासार्डे विद्यालयाचा 97.63 टक्के निकाल

कासार्डे विद्यालयाचा 97.63 टक्के निकाल

श्रुती वरूणकर प्रथम तर मंथन कुलकर्णी द्वितीय

तळेरे: प्रतिनिधी

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यापरीक्षेला कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातून 127 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.पैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.६३ टक्के लागला आहे.
कु. श्रुती अतुल वरूणकर हीने 89.60 टक्के विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकवला आहे.
तर मंथन प्रेमानंद कुलकर्णी याने 89.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक,निशांत गणेश लाड 85 टक्के तृतीय,आर्या पंकज कुडतरकर व प्रितिका सदानंद चौगुले 84.80 टक्के गुणांसह विभागून चतुर्थ तर शुभम उमेश राणे याने 84.60 टक्के गुणांसह पाचवा येण्याचा मान पटकवला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य एम.डी. खाडये, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

१.श्रुती वरूणकर,
२.मंथन कुलकर्णी,
३.निशांत लाड

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − four =