You are currently viewing …..”तुम्ही फक्त सीवर्ल्ड प्रकल्पाबाबत ठोस भाष्य करण्याची हिंमत दाखवावी! उगाच आडाळीवर बोलून आपल्याच नेत्यांची लाज काढून घेण्याचा कावेबाजपणा करू नये!”

…..”तुम्ही फक्त सीवर्ल्ड प्रकल्पाबाबत ठोस भाष्य करण्याची हिंमत दाखवावी! उगाच आडाळीवर बोलून आपल्याच नेत्यांची लाज काढून घेण्याचा कावेबाजपणा करू नये!”

—भाजपा प्रवक्ता बाबा मोंडकर यांचा वैभव नाईकांना उपरोधिक सल्ला.

मालवण

आमदार वैभव नाईक यांनी स्वतःच आपल्या कारकिर्दीचे आत्मपरीक्षण करावे. शेतकरी नुकसान भरपाई, रस्त्यावरचे जीवघेणे खड्डे, हॉस्पिटलची दुरावस्था अशा कितीतरी प्रश्नांमुळे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. असे असतानाही दोडामार्गच्या आडाळी विषयाला मुद्दामच टोक काढून स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा बेरकी डाव ते खेळत आहेत.

यापूर्वी स्वतःच्या तोंडानेच खासदार विनायक राऊत यांनी आघाडीतले मंत्री असलेले अमित देशमुख यांचा प्रकल्प पळवण्याच्या प्रयत्नाबाबत जाहीरपणे निषेध केला आहे. अमित देशमुख हे कोकणातील एकमेव मंत्रिपद असलेल्या उदय सामंत यांच्याही पत्राला भीक घालत नसल्याचे आणि साधी भेटही देत नसल्याचे तुमचे रडतराऊत खासदार जाहीरपणे सांगतात. तिथले स्थानिक आमदार हे आता मनाने तुमच्या पक्षातच नसल्याचे आमच्याकडून वदवून घेण्यातले तुमचे स्वारस्य आम्हाला समजते. तेव्हा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांची “राजकीय विकेट” काढण्यासाठी आपण औषधी वनस्पती संशोधन केंद्र प्रकल्पाचा विषय उगाळून काढत आहात, हे न कळण्याएवढे सिंधुदुर्गात तरी कोणी दुधखुळे राहिले नाहीत. असली बेरकी राजकारणे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघात कुजत घातलेल्या “सीवर्ल्ड” प्रकल्पाबाबत आपल्या हातून काही सकारात्मक करता येईल का ते पहावे. आडाळी प्रकल्प कोण कुठे कसा नेतो ते आम्ही पाहतोच. ते आमच्यावर सोडावे. आमचे मंत्री मा.श्रीपाद नाईक, प्रमोद जठार, नारायणराव राणे, नीतेश राणे, राजन तेली हे आपण आणलेला प्रकल्प कसा राखायचा ते जाणतात. हा केंद्राचा प्रकल्प आहे, त्यासाठी फक्त पाहून फायनल केलेली जागा तेवढी तुमच्या सरकारकडून मंजूर होणे बाकी आहे. तेही तुमच्याने होत नाहीय. असे असताना तिथे तुम्हाला दंडाच्या बेटक्या फुगवून दाखवण्याचा नैतिक अधिकार खरोखरच आहे, हे आधी तुमच्या मनाला विचारून घ्या.

तुम्हाला ज्या काय दंडाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवायच्या असतील, त्या सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या पुर्ततेबाबत फुगवून दाखवाच! आपण सीवर्ल्डबद्दल काय करणार त्याबद्दल कधीतरी मुखाने बोलण्याची हिंमत दाखवा. राज्याच्या या प्रकल्पासाठी जागा देणे, प्रकल्प मंजूर करून घेणे, आर्थिक तरतूद करून घेणे अशा कितीतरी बाबीत तुमचे कार्यकर्तृत्व दाखवून द्यायला पुरेसा वाव आहे. तिथे रिंगणात उतरून काय मर्दानगी दाखवायची ती दाखवा, आम्हीच काय सारा महाराष्ट्र तुमचे त्यासाठी कौतुक करेल. त्यानंतर मग मंत्रीपदासाठी फोटोसेशनची स्टंटबाजी आणि मातोश्रीची गृहसेवा करायची पाळी येणार नाही असे वाटते, असा उपरोधिक सल्ला सिंधुदुर्ग भाजपाचे प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी कुडाळ-मालवणचे शिवसेना आमदार  वैभव नाईक यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =