You are currently viewing वाभवे – वैभववाडीत आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वाभवे – वैभववाडीत आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैभववाडी

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 23 जून रोजी संताजी अरविंदराव राणे माजी नगरसेवक नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांनी दरवर्षीप्रमाणे 10 वी व 12 वी मधील वैभववाडी तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच नगरपंचायत हद्दीतील प्राथमिक मुलांना वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. हा समारंभ सकाळी 11 वाजता महाराणा प्रतापसिंह कलादालन सभागृह वैभववाडी पंचायत समिती वैभववाडी नजीक होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नितेश राणे असून प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार झळके, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वैभववाडीचे श्री. यादव पोलीस उपनिरीक्षक श्री. देसाई, पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील वैभववाडी हे उपस्थित राहणार आहेत आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नेहा माईणकर नगराध्यक्ष, संजय सावंत उपनगराध्यक्ष, विवेक रावराणे, नासिरभाई काझी, दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, बाळासाहेब हरियाण, प्राची तावडे, राजेंद्र राणे किशोर दळवी सुधीर नकाशे, आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत

या कार्यक्रमाचे आयोजन व पुरस्कृत संताजी अरविंद रावराणे माजी नगरसेवक वैभववाडी यांनी केले आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा