You are currently viewing विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीचा संकल्प करून शिक्षण घ्यावे – केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे

विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीचा संकल्प करून शिक्षण घ्यावे – केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नांदगाव,कासार्डे आणि कणकवली येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

 

कणकवली :

भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक प्रगतीत गेल्या आठ वर्षात पाचव्या क्रमांकावर नेले आहे. भारताची ही कामगिरी महासत्ता बनण्याच्या दिशेने चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला देश जागतिक प्रगतीच्या तिसऱ्या क्रमांकावर न्यायचा आहे. आणि या महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या देशाचे तुम्ही कॉलेज युवक-युवती नागरिक आहात. त्यामुळे चांगल्या कामाची आणि चांगल्या ज्ञानाची सवय लावा. ध्येय डोळ्यासमोर ठेवून संकल्प करून शिका. श्रीमंत व्हायचे आहे त्यासाठी अपग्रेडेशन होणे गरजेचे आहे. समाजात घडणारे चांगले बदल आत्मसात करणे गरजेचे आहे. कॉलेज युवकांकडून देशाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा बाहू करू नका. आपण गरिबीत जन्माला आलो हा तुमचा दोष नाही तर त्यावर मात करून स्वाभिमानाने जीवन जगणे आणि कर्तुत्ववान होणे हे तुमचे कर्तव्य आहे.असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म-लघु- मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

आत्मविश्वास वाढवा मग तुमच्या मनात आपसूकच महत्त्वाकांक्षा जागृत होईल. आणि तेव्हाच तुम्ही यशाच्या दिशेने पाऊल टाकाल अशावेळी आत्मविश्वासाला श्रमाची, कष्टाची जोड द्या. असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

केंद्रीय सूक्ष्म-लघु- मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नांदगाव येथील प्राथमिक शाळा, कसार्डे येथील माध्यमिक विद्यालय व कणकवली शहरातील एस.एम.हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची थेट संवाद साधला. यावेळी भाजपचे आ. नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी, यांच्यासह कासार्डे हायस्कूलचे चेअरमन प्रभाकर कुडतरकर, मुख्याध्यापक मधुकर खाडे, जगदीश खाड्ये, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, अरविंद कुडतरकर, उपप्राचार्य कुचेकर, संजय देसाई, कासार्डे सरपंच नीता नकाशे, रवींद्र शेट्ये, उपसरपंच गणेश पाताडे, शैलेश सुर्वे, ओझरम सरपंच समृद्धी राणे, संतोष पारकर, दिलीप तळेकर, प्रकाश पारकर, बाळ जठार, रवींद्र पाताडे, संजय पाताडे, नांदगाव प्राथमिक शाळा येथे नांदगाव सरपंच भाई मोरोजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, नागेश मोरये,पंढरी वायंगणकर, मुख्याध्यापक सुहास सावंत, तर कणकवली येथील एस.एम. हायस्कूल मध्ये संस्था अध्यक्ष डॉ.सूर्यकांत तायशेट्ये, चेअरमन डी. एम. नलावडे, सौ. वायंगणकर,भाजपा अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मेघा गांगण आदी उपस्थित होते.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे कॉलेज युवक-युवती यांच्या सोबत संवाद साधताना म्हणाले, अमेरिकेसारख्या देशात व्यक्तीचे दरडोई उत्पन्न ६५ लाख रुपये आहे. तर भारत १ लाख ८० हजार रुपये दरडोई उत्पन्नात आहे. त्यामुळे आपल्याला श्रीमंत बनायचे आहे.अजून प्रगती करायची आहे. व्यक्तीची प्रगती होईल तेव्हाच देश श्रीमंत होईल आणि त्यासाठी व्यवसाय उद्योग आणि निर्मितीच्या प्रक्रियेत आपल्याला मोठी भरारी घ्यावी लागणार आहे. व्यवसायात कोकणी किंवा मालवणी माणूस एक टक्का सुद्धा नाही. निदान येणाऱ्या पिढीने तरी या उद्योग क्षेत्रात असलेली उणीव भरून काढावी. चांगले शिक्षण घ्यावे. नोकरीबरोबरच व्यवसायात प्रगती करावी. त्यासाठी एक संकल्प करून शिक्षण घ्यावे लागेल. मुलींनी सुद्धा तोच दृष्टिकोन ठेवावा. पूर्वी मुलींना विवाह योग्य बनवण्यासाठी शिक्षण दिले जात होते आता ती देशात परिस्थिती नाही. अनेक महिला आयएस, आयपीएस अधिकारी बनलेले आहेत. उद्योजिका बनलेले आहेत, तुम्ही सुद्धा असेच करिअर निर्माण करा. त्यामुळे प्रगतीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा. जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. असे सांगताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले मी ३५ वर्ष मंत्री आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला, गरीबीत वाढलेला मुलगा. मी कधी परिस्थितीशी हार मानली नाही. प्रसंगी पेपर टाकले, छोटे-मोठे उद्योग केले आणि आज उद्योगाबरोबरच राजकारणातही यशस्वीरित्या काम करत आहे. सुरुवातीला गॅरेज,हॉटेल, स्पेअर पार्ट चे दुकान असे व्यवसाय केले. आज फाईव्ह स्टार हॉटेल्स आम्ही चालवतो. अशीच प्रगती तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तुमच्याकडून देशाला समाजाला, मला सुद्धा फार अपेक्षा आहेत,कारण आजचा विद्यार्थी हाच उद्याचा नागरिक आहे. माझे उदाहरण स्वतःच्या मोठेपणासाठी नाही तर तुम्हाला प्रेरणा मिळावी सामान्य कुटुंबातील युवक सुद्धा देशाचा केंद्रीय मंत्री, राज्याचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता,अनेक खात्यांचा मंत्री अशा पदांवर पोचू शकतो. मात्र हा प्रवास सहज सोपा नाही आणि त्या प्रवासात मेहनत आहेच आत्मविश्वास कायमच ठेवावा लागतो. दरदिवशी १६ तास काम ,तर कमीत कमी २ तास तरी वाचन करावेच लागते. वाचन थांबवत नाही. चित्रपट पाहत नाही मात्र विचारवंतांचे लेक्चर्स मुद्दामून पाहतो, ऐकतो. असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

आपल्यात कोणतीच उणीव नाही असा आत्मविश्वास बाळगून युवकांनी शिकावे, उद्योजक, नेता, मंत्री, व्यवसायिक, इंजिनियर, डॉक्टर ,आयएस,आयपीएस आणि चांगला माणूस सुद्धा बनण्याचा संकल्प करून अभ्यास करा. असेही आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − eight =