You are currently viewing कणकवलीत उभारण्यात आलेल्या शवदाहिनीची “ट्रायल” यशस्वी…

कणकवलीत उभारण्यात आलेल्या शवदाहिनीची “ट्रायल” यशस्वी…

पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करा; नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचे आवाहन…

कणकवली

येथील नगरपंचायतच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विद्युत शवदाहिनीची आज “ट्रायल” घेण्यात आली. आज या यंत्रणेचा वापर करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पारंपरिक पद्धतीपेक्षा विद्युत वाहिनीचा वापर झाल्यास अवघ्या दोन तासात मृतदेह दहन होतो. तसेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले. याबाबतची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभिजीत मुसळे उपस्थित होते.यावेळी हर्णे म्हणाले कणकवली नगरपंचायतने कोरोना काळात शवदाहिनी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्युत शवदाहिनी दिल्या होत्या. त्या विद्युत शवदाहिणीतून अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात.
मृतदेहाचे शवदहन आम्ही मोबाईल द्वारे चित्रीकरण केले आहे. या दहन प्रक्रियेला २ फुटाचे लाकडाचे तुकडे लागतात, फक्त २०% टक्के लाकडे लागतात. अवघ्या दोन तासात मृतदेह दहन होतो धूर हा त्याच मशीन मध्ये फिल्टर होऊन बाहेर जातो. त्यामुळे प्रदूषण न होत नाही. मृतदेह जळल्यानंतर राख देखील अल्प प्रमाणात होते. मृतदेहाची राख होत नाही. फक्त कपड्यांची राख होते. मृतदेहाचे अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात. हिंदू धर्मातील सर्व विधी करता येतात. त्यामुळे मृतदेह दहनासाठी विद्युत दाहिनीचा वापर करावा. निसर्ग वाचविण्यासाठी नगरपंचायतीला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात पहिला मृतदेह कणकवलीत विद्युत दाहिनीत दहन करणे यशस्वी झाले असल्याचे हर्णे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + eleven =