You are currently viewing स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व देवगड पोलीसांनी केलेल्या कारवाईत १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व देवगड पोलीसांनी केलेल्या कारवाईत १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व देवगड पोलीसांनी केलेल्या कारवाईत १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त

 सिंधुदुर्गनगरी

 

  प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान मसाला, तंबाखू व तत्सम अन्न पदार्थांची विक्री, वाहतूक, साठा करणाऱ्यावर  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व देवगड पोलीसांनी कारवाई करुन सुमारे १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त केला अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी दिली.

                पोलीसअधीक्षक सौरभ अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखु व तत्सम अन्न पदार्थांची विक्री, वाहतूक, साठा करणान्यांविरुध्द कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक श्री. संदिप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले होते.

            सदर पथकास मांगे मोड, घाडीवाडी, ता. देवगड येथे राहणारा इसम हा आपले घरात गुटखा व पान मसाल्याची विक्री करीत असलेबाबत माहीती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक, रामचंद्र शेळके व देवगड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सापळा रचला, १९ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच देवगड पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संशयित इसमाचे घरी छापा टाकला असता घरामध्ये 1,42,567/- रुपये (एक लाख बेचाळीस हजार पाचशे सदुषष्ठ रुपये) किंमतीचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व तंबाखु असा मुद्देमाल सदर इसमाचे ताब्यात मिळून आला.

                 ही कारवाई देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळळे, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संकेत खाइये, रवि इंगळे तसेच देवगड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलीस अंमलदार आर. एस. जाधव, एफ. जी. आगा, आशिष कदम यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा