You are currently viewing गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घटना घडताच तात्काळ सिल्व्हर ओक या घटनास्थळी घेतली धाव…

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घटना घडताच तात्काळ सिल्व्हर ओक या घटनास्थळी घेतली धाव…

घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत केला निषेध

देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार मा.शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर आज झालेल्या हल्ल्याच्या काही वेळातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार जितेंद्र आव्हाड,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री‌, अमित सामंत हे आजच्या घटनास्थळी धाव घेतली आणि झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करुन,देशाला लांच्छनास्पद या हल्ल्याची घटना आहे.न्यालयाचा निर्णय संपकरी कामगारांनी काल मान्य करून गुलाल उधळीत जल्लोष केला होता, पण संप पुरस्कर्त्याना हा जल्लोष मान्य झाला नाही.या अपयशाचा वचपा काढण्यासाठी व आपला न्यायालयीन पराभव सहन झाला नाही या आविर्भावातूनच हा पूर्व नियोजित हल्ला होता या हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करत असून या हल्ल्यास जबाबदार असलेल्या व्यक्ती कितीही मोठ्या असल्या तरी यांच्या वर राज्य शासनाने कडक भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली,

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 3 =