You are currently viewing शनिवारी १३ जानेवारीला माडखोल भराडीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव

शनिवारी १३ जानेवारीला माडखोल भराडीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

माडखोल डूंगेवाडी येथील श्री देवी भराडी वार्षिक जत्रोत्सव शनिवारी १३ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे.

संध्याकाळी ग्रामदैवत श्री देवी पावणाईच्या तरंग काठीचे सवाद्य आगमन झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापुजा, सायंकाळी ७ वाजता आरती तीर्थ प्रसाद होणार आहे. रात्री १० वाजता प्रसिध्द भजनी बुवा संदीप लोके यांचा सिंगलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना संगीत साथ योगेश सामंत (पखवाज), संदेश सुतार (तबला) यांची आहे. रात्री १२ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा (नेरूर ) ‘पराशक्ती दहन’ अर्थात ‘भावई महिमा’ हा नाटय प्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डूंगेवाडी ग्रामस्थानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =