You are currently viewing चिटणीस नाका येथे दुचाकी थेट टेम्पो खाली गेल्याने अपघात, दोन युवती जखमी…

चिटणीस नाका येथे दुचाकी थेट टेम्पो खाली गेल्याने अपघात, दोन युवती जखमी…

सावंतवाडी

कारला ओव्हरटेक करताना दुचाकी चालक युवतीचा ताबा सुटून गाडी थेट टेम्पोच्या खाली गेल्याने दोन युवती जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास येथील चिटणीस नाका परिसरात घडला. मयुरी कुमार नेरुरकर व अस्मिता सुबोध नेरुरकर दोन्ही रा.कोलगाव अशी दोघांची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहीत अशी की,बाजूने जाणार्‍या कार चालकाला ओव्हरटेक करीत असताना संबधित मुलीचा गाडीवरील ताबा सुटला.व गाडी थेट समोर असलेल्या टेम्पोला आदळून चाकाच्या मागे धडकली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अपघाताचा आवाज ऐकताच बाजूला असलेल्या नागरीक व प्रवाशांनी त्याठीकाणी तात्काळ धाव घेतली. व दोन्ही जखमी मुलींना बाहेर काढत सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले.याबाबतची माहीती मिळाल्यानंतर पोलिस हवालदार मनोज राउत व देवदत्त कांडरकर यांनी त्या ठीकाणी धाव घेत पंचनामा केला.परंतू उशिरा पर्यत कोणाचीही तक्रार नसल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =