You are currently viewing सावंतवाडी ठाकरे व शिंदे गटाकडुन तहसीलदार श्रीधर पाटील यांचे स्वागत

सावंतवाडी ठाकरे व शिंदे गटाकडुन तहसीलदार श्रीधर पाटील यांचे स्वागत

सावंतवाडी

येथील तहसीलदार म्हणून श्रीधर पाटील यांनी आज आपला कार्यभार स्विकारला. यावेळी ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ व शिंदे गटाचे शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर या दोघांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी श्री. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले तसेच लोकांना अभिप्रेत असे आपण काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांना लवकरात-लवकर दाखले देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, वासुदेव होडावडेकर यांच्यासह नायब तहसिलदार मनोज मुसळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा