You are currently viewing शिवसेनेच्या जेष्ठनेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात

शिवसेनेच्या जेष्ठनेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात

मुंबई

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांचा प्रवेश म्हणजे ठाकरे शिवसेनेला धक्का मानला जात आहे. तर हा प्रवेश ऐतिहासिक आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आपल्याला राजकारण विरहित काम करायचे आहे. तसेच महिलांना न्याय द्यायचा आहे. न्यायालयाने शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे या शिवसेनेवर विश्वास ठेवून आपण प्रवेश केला. आता पक्ष वाढण्यासाठी काम करणार आहे, असा दावा गो-हे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 19 =