You are currently viewing सौ. श्रद्धा विठ्ठल आरोलकर ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ पुरस्काराने सन्मानित

सौ. श्रद्धा विठ्ठल आरोलकर ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ पुरस्काराने सन्मानित

वेंगुर्ला/प्रतिनिधी :

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या अंतर्गत सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षातील आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या वतीने; सौ. श्रद्धा विठ्ठल आरोलकर यांची या पुरस्कारा साठी निवड करण्यात आली .

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून आडेली वेंगुर्ला प्रभागात सौ. आरोलकर यांनी प्रशंसनीय कार्य केले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेत महिला दिनाच्या अवचित्त्यावर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सौ. आरोलकर यांना पुरस्कृत करण्यात आले .

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 2 =