You are currently viewing प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा..

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा..

मनसेने वेधले एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष

 

कुडाळ :

कुडाळ येथील एमआयडीसी प्रकल्प स्थापन होऊन जवळपास ४० ते ४२ वर्षे झाली.एमआयडीसी प्रकल्पासाठी कुडाळ, नेरुर, पिंगुळी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी मोठे उद्योग येऊन स्थानिकांना रोजगार मिळेल या आशेने अत्यल्प मोबदल्यात आपल्या जमिनी दिल्या.मात्र आज एवढी वर्षे होऊन देखील ना रोजगाराचा पत्ता ना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांची पूर्तता असे चित्र आहे.

मागील अनेक वर्षापासून एमआयडीसी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या पाण्याचाही प्रश्न सोडवता आलेला नाही.पुरेशी जमीन उपलब्ध होत नसल्याने इतर योजनांमार्फत शासन स्तरावर पाण्यासाठी कोणतीही योजना राबविणे शक्य नाही. ) प्रकल्पग्रस्त शेतकरी केली अनेक वर्षे एमआयडीसी प्रशासनाकडे पाण्याची मागणी करत आहेत तीही रीतसर पाणीपट्टी भरून मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हाताला फक्त आश्वासनां व्यतिरिक्त काहीही लागलेले नाही.एकीकडे कुडाळ पासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या विमानतळ प्रकल्पास करोडो रुपये खर्च करून नवीन पाईपलाईन करून पाणीपुरवठा योजना लगेचच मंजूर केली जाते तर दुसरीकडे एमआयडीसीला लागून असलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पाणी देण्यास एवढी वर्षे का लागतात ? औद्योगीकरणासाठी परवानगी असताना मिळालेली जागा निवासी म्हणून वापरणाऱ्यांना शेकडो लिटर पाणी पुरवले जाते तर मग प्रकल्पग्रस्त पाण्यापासून वंचित का?

अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मनसे शिष्टमंडळाने एमआयडीसी उप अभियंता श्री.रेवंडकर यांना जाब विचारला व आर या पारचे निवेदन सादर केले.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार होऊन पाण्याचा पुरवठा करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रकल्पग्रस्तांसोबत जनआंदोलन उभारून कायदा हातात घेईल असा इशारा मनसेने निवेदनाद्वारे एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिला आहे.यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,विभाग अध्यक्ष सुंदर गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + three =