…अन्यथा गोवा पासिंग एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही

…अन्यथा गोवा पासिंग एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही

डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व जितेंद्र गावकर यांचा इशारा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर वर होणाऱ्या कारवाई बाबत आज सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व मळगाव दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष जितेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज डंपर व्यवसायिकांची बैठक संपन्न झाली आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी यासाठी येत्या दोन दिवसात प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील डंपर व्यवसायिकांना गोवा राज्यात नाहक त्रास दिला जात असून, हा त्रास न थांबल्यास गोवा पासिंगची एकही डंपर गाडी जिल्ह्यात येऊ देणार नाही असा गंभीर इशारा सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व जितेंद्र गावकर यांनी दिला आहे.

यावेळी डंपर चालक मालक संघटनेचे प्रशांत पांगम, गुणाजी गावडे, साई राणे, पंकज पेडणेकर, जयवंत कुडतरकर, बबन डिसोजा, आनंद कुंभार, दानिश बेग, शंकर सावंत, रुपेश सावंत, भाऊ नाटेकर, झेवियर रोड्रिकस व शेकडो डंपर व्यवसायिक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा