You are currently viewing दत्तलहरी!! जगातील एकमेव हिंदुराष्ट्र..

दत्तलहरी!! जगातील एकमेव हिंदुराष्ट्र..

“श्री गोरक्षनाथ येति भटगाव ग्रामे येथील लोक त्यांचा अनादर करती,

श्री गोरक्षनाथ उग्र क्रोधायमान रूप धारण करती अखंड ग्रामे जलवृष्टी करती ,

ग्रामातील लोक दलादन ऋषींना प्रार्थना करती ऋषीमुनी स्वामी श्री दत्तात्रेयांचे ध्यान करती ,

तया ग्रामे अपराधाचे परिमार्जन करुनी ग्रामे धन धान्ये समृद्ध होई”

*श्री क्षेत्रे दत्तलहरी*

जगातील एकमेव हिंदुराष्ट्र म्हणून नेपाळची प्रसिद्धी आहे राजधानी काठमांडू भोवती अनेक हिंदू देवांचे दर्शन होते भैरवाचे मंदिर, कृष्णमंदिर, स्वयंभूनाथ मंदिर इत्यादी देवतांचे दर्शन या नेपाळमध्ये होते.

भटगाव म्हणजे भक्तपुर मध्ययुगीन स्थापत्याचे आणि कलाकुसरीचे दर्शन येथे होते. येथील दत्तमंदिरे एका झाडाच्या मुळाशी आहे. सन 1427 मध्ये राजा यक्षमल्ल यांच्या कारकिर्दीत हे मंदिर तयार झाले. पुढे पंचवीस तीस वर्षांनी विश्वमल्ल या राजाने याचा जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ पुजाऱ्यांचा मठ आहे जवळच गणपतीचे मंदिर आहे.

काठमांडू या राजधानी पासून पूर्वेस नऊ मैलावर भटगाव आहे. आनंदमय या राजाने हे गाव वसविले. येथील दत्तमूर्ती एकमुखी आणि द्विभुज आहे. नेपाळमधील अत्यंत जागृत असे हे स्थान आहे. भटगाव येथील श्री दत्तात्रेयामुळे या स्थानास महत्व आहे. दलादन ऋषींनी या ठिकाणी तपस्या केली. एकदा गोरक्षनाथ येथे येऊन गेले. त्यांचा अनादर गावाच्या लोकांनी केला म्हणून त्यांनी अखंड जलवृष्टी केली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांनी दलादनांना प्रार्थना केली. त्यांनी दत्तात्रेयांना विनंती केली. हीच ‘ दत्तलहरी ‘ या नावाने प्रसिद्ध आहे.

श्रीदत्तांच्या कृपेने येथील जलवृष्टी कमी झाली आणि पीकपाणी चांगले आले. याची आठवण म्हणून भटगाव येथे ‘दत्तात्रेयांचे’ स्थान निर्माण झाले. भक्तापुर नेपाळ येथे असलेले स्थान निर्माण झाले. भक्तापुर हे नेपाळ येथे असलेले हे दत्तमंदिर 15व्या शतकात बांधले आहे. या मंदिराचे वैशिष्टय असे की, ते एकाच झाडाच्या लाकडाचे बांधले आहे. मंदिराच्या भव्यतेवरून ते झाड किती अवाढव्य असले याची कल्पना करणे अशक्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =