You are currently viewing भारतीय जैन संघटनेची नाशिक येथे रविवारी राज्यस्तरीय बैठक

भारतीय जैन संघटनेची नाशिक येथे रविवारी राज्यस्तरीय बैठक

राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड मार्गदर्शन करणार!

देवगड

भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न राज्य विभागीय,जिल्हा शहर ,पदाधिकारी सभा व बिजेएस एक्सलन्स अवार्ड २०२२ वितरण सोहळा रविवार दि.६ नोव्हेंबर रोजी स.९.३० ते साय.४ या वेळात महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात भारतीय जैन संघटना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या प्रसंगी राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब,राज्य प्रभारी नंदकुमार साखला,राज्य सचिव अभय सेठिया,राज्य उपाध्यक्ष दीपक चोपडा,उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जैन संघटना च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा