You are currently viewing सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे डेरवण येथील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश

सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे डेरवण येथील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश

सिंधुदुर्ग :

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी आयोजित 14 व 17 वर्षाखालील मुले व मुली या गटातील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा नुकत्याच डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये दिनांक 15 व16 जानेवारी 2023 रोजी पार पडल्या. यामध्ये सिंधुदुर्गच्या 17 वर्षाखालील पाच मुली व 14 वर्षाखालील एक मुलगा यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान पटकावले.

या सहा खेळाडूंमध्ये दीक्षा चव्हाण(कनेडी), प्रणिता आयरे, मयुरी गावडे (सावंतवाडी), पूर्वा केतकर(देवगड),साक्षी रामदूरकर (सावंतवाडी) व अमूल्य घाडी (सावंतवाडी) या खेळाडूंचा समावेश आहे.

डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गचे अकरा खेळाडू सहभागी झाले होते. हे सर्व खेळाडू कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत होते.

यामध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सावंतवाडीच्या अमूल्य घाडी याने अंतिम सामन्यात पुण्याच्या प्रणव गायकवाड वर विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या गटात पूर्वा केतकर व साक्षी रामदूरकर यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कनेडी, कणकवलीच्या दीक्षा चव्हाण हीने सावंतवाडीच्या प्रणिता आयरे हिच्यावर विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. मयुरी गावडे हीने तिसरा क्रमांक मिळवून राष्ट्रीय कॅरम स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. किरण बोरवडेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते, प्रमुख पंच मंदार दळवी, क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व विजेत्या खेळाडूंचे सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशन व कॅरम खेळाडूंकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − nine =