You are currently viewing शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीचे घवघवीत यश

शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीचे घवघवीत यश

वैभववाडी

दरवर्षी प्रमाणे कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा घेण्यात आली. इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच कला संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. वैभववाडी येथील केंद्र क्रमांक ११५०१४ (अर्जुन रावराणे विद्यालय ) या केंद्रावर इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकुण १२७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केंद्राचा निकाल ८७.४०% लागला आहे. परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी उत्कर्ष लक्ष्मण हांडे, वैष्णवी भास्कर नादकर, प्रारब्ध प्रकाश पाटील, हर्ष अनिल पराडकर, खाजगी विद्यार्थ्यांमधून श्रावणी गंगाधर केळकर, सुयोग शशीकांत तांबे या सहा विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, १७ विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी तर ८८ विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तर अर्जुन रावराणे विद्यालयाचे १९ विद्यार्थी या इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. प्रशालेच्या परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ०५ विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, ०२ विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी तर १२ विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली आहे.

रेखाकला परीक्षेतील सहभागी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मंदार चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले होते. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख बी.एस.नादकर यांनी अभिनंदन केले. सदर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधील एस.एस.सी परीक्षा मार्च २०२३ मध्ये प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राप्त श्रेणी नुसार निकालामध्ये वाढीव गुणांच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
ज्या सहभागी शाळांना निकाल पडताळणीसाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यांनी प्रती विद्यार्थी ६०/- रुपये शुल्कासह व प्रमाणपत्रावरील दुरुस्तीसाठी प्रती विद्यार्थी १००/- रुपये शुल्कासह संबंधित शाळेने दि.२८-०१-२०२३ पर्यंत केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्र प्रमुख बी.एस.नादकर व कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =