You are currently viewing आज पासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

आज पासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबईः

राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई आणि परिसरातील शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरायचे कसे असा प्रश्न शाळा मुख्याध्यापकांना पडला आहे. शाळा बंद असताना अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी राबविणार यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी दहावी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 23 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरायचे असून 12 ते 25 जानेवारी या कालावधीत पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील, तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसलेले विद्यार्थी परीक्षा अर्ज करू शकणार आहेत.
विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज शाळेतूनच भरावा, अशी सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या विभागातील शाळा अद्यापही बंदच आहेत. तेथील मुख्याध्यापकांना परीक्षा अर्ज कसा आणि कधी भरून घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. राज्यातील अनेक भागातील दहावीचे वर्ग अद्यापही ऑनलाईन सुरू आहेत. शाळा प्रत्यक्षात सुरू कधी होतील, याबाबत संभ्रम आहे, अशा परिस्थितीत अर्ज कसे भरायचे याविषयी शिक्षण मंडळाने केणत्याही सूचना दिल्या नसल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

दहावीचे बरेचसे विद्यार्थी मुंबईबाहेर आहेत. अशावेळी घाईघाईने ही प्रक्रिया सुरू करणे अन्यायकारक आहे. अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड तसेच विद्यार्थी स्वाक्षरी लागते, तसेच परीक्षा शुल्क देखील भरावे लागते. मूळात परीक्षा प्रवेश अर्ज ऑनलाईन भरले जात असल्याने आणि तत्काळ हॉलतिकीट जनरेट होत असल्याने जानेवारी महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात ही प्रक्रिया सुरू करायला हवी होती, असेही रेडीज यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fifteen =