You are currently viewing धारगळ-पेडणे येथे दुचाकी खांबाला धडकून झालेल्या अपघातात निरवडेतील युवक ठार…

धारगळ-पेडणे येथे दुचाकी खांबाला धडकून झालेल्या अपघातात निरवडेतील युवक ठार…

सावंतवाडी

धारगळ-पेडणे येथे झालेल्या दुचाकी अपघातात निरवडे येथील युवक जागीच ठार झाला आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळच्या सुमारास घडला. वासुदेव पेडणेकर (२५, रा. झरबाजार) असे त्याचे नाव आहे. दुचाकी सिमेंटच्या खांबाला धडकून ही दुर्घटना घडली. दरम्यान अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे संबंधित युवकाचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी गोव्यात धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक आपल्या ताब्यातील दुचाकीने गोवा येथून घरी परतत होता. यावेळी धारगळ ग्रामपंचायत परिसरात तो आला असता मुंबई-गोवा महामार्गावर दुभाजका जवळील सिमेंट खांबाला त्याच्या दुचकीची जोरदार धडक बसली. यात तो रस्त्यावर आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती दिल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप परिसरातील स्थानिकांनी केला आहे. वासुदेव हा गोवा येथे कामाला होता. तेथून आज घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. तर वासुदेव हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =