You are currently viewing इन्सुली दुग्ध संस्थेचा नववा वर्धापनदिन उत्साहात साजरा

इन्सुली दुग्ध संस्थेचा नववा वर्धापनदिन उत्साहात साजरा

बांदा

इन्सुली येथील सहकारी दुग्ध संस्थेचा नववा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांत जास्त दुध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संजय सावंत, रुपेश कुडव, अशोक शेट्ये, रामा कुडव, महेश कोठावळे या दुग्ध उत्पादकांना माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तसंच संस्थेचे संचालक विकास सोसायटीवर निवडून आले त्यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे माजी संचालक व इन्सुली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विनोद गावकर यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती अंकुश जाधव, पंढरी राऊळ, उमेश पेडणेकर, विकास केरकर, सी व्ही सावंत, विनेश गवस, प्रवीण देसाई, डेगवे सरपंच राजन देसाई, संजय सावंत, सहदेव सावंत, सखाराम बागवे, महेद्र पालव, विलास गावडे, रामचंद्र पालव, सौ सुहानी गावडे, साबाजी परब, रघुविर देऊलकर, सुधिर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री पेडणेकर म्हणाले की, इन्सुली गावातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्याच्या दुष्टीने दुधाचा शास्वत व्यवसायाकडे सकारात्मक दुष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे, यासाठी गोकूळ कडून दरही चांगला मिळतो तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या विविध योजना गोकूळ व सिधुदुर्ग जिल्हा बॅक राबविणार आहे याचा फायदा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घेवून दिवसाला एक हजार लिटर दूध दशक महोत्सवी वर्षामध्ये संकलित करण्याचा संकल्प करावा.
यावेळी श्री कामत यानी संस्थेच्या पहाधिकाऱ्यांचे कौतूक केले. आपल्या हस्ते उद्घाटन होवून अवघ्या दहा लिटर वर सुरवात करण्यात आलेली संख्या आज साडेसहाशे लिटर व एक नविन शाखा स्थापन करून खरा दुग्ध उत्पादनात आदर्श निर्माण करणारी संस्था ठरली आहे. यावेळी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे सिध्देश कलिंगण यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक गुरुनाथ पेडणेकर यांनी केले. सूत्रसंचलन गौरवी पेडणेकर तर आभार विनोद गावकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 14 =