You are currently viewing जबरदस्त मंडळाचे काम आदर्शवत असेच सेवाभावी उपक्रम सुरू ठेवावेत – मनिष दळवी

जबरदस्त मंडळाचे काम आदर्शवत असेच सेवाभावी उपक्रम सुरू ठेवावेत – मनिष दळवी

वेंगुर्ले

वेंगुर्लेत जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम राबवित असलेल्या जबरदस्त कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने आदर्शवत काम सुरु केले आहे. असेच सेवाभावी, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विविध स्पर्धा, व सामाजिक उपक्रम मंडळाने सातत्याने राबवावेत. अशा कार्यक्रमांसाठी आपण सहकार्य करीन. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी जबरदस्त मंडळाच्या बक्षिस वितरण प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना केले.

वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने गरुडझेप महोत्सव 2023′ अंतर्गत आयोजित केलेला चित्रकला, रंगभरण, रस्सीखेच स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ राऊळवाडा येथील नायरा पेट्रोलपंप समोरील कार्यक्रम स्थळी संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरात अध्यक्षस्थानी मनिष दळवी, शिवसेनचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, ज्ञानेश्वर केळजी, शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच सुमन कामत, वेंगुर्ले नगर पाfरषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, देवस्थानचे मानकरी रवींद्र परब, उभादांडा उपसरपंच टिना आल्मेडा, भाऊ मालवणकर, विरेंद्र कामत-आडारकर, वृंदा गवंडळकर, कार्मीस आल्मेडा, संजय गावडे, खर्डेकर महाविद्यालयाचे संजय पाटील, नामदेव सरमळकर, पिंटू कुडपकर, आनंद रेडकर, विलास कुबल आदींचा समावेश होता. जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा वेंगुर्ला यांनीगरुडझेप महोत्सव 2023′ अंतर्गत आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेतील विजेते- पहिली ते दुसऱी गट- प्रथम- रुजल योगेश सातोसे (कुडाळ), द्वितीय- आराध्या मंदार राऊळ (वेंगुर्ला), तृतीय- सानवी मनीष सातार्डेकर (वेंगुर्ला), चित्रकला स्पर्धा- तिसरी ते चौथी गट-प्रथम- मनस्वी भूपेंद्र खानोलकर (वेंगुर्ले शाळा नं. 1), द्वितीय- हर्षांक रमेश टेमकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन वेंगुर्ले), तृतीय- कौस्तुभ समीर परब (वेंगुर्ले शाळा नं. 1), पाचवी ते सातवी गट- प्रथम- प्रिया प्रदीप देसाई (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), द्वितीय- सर्वेश विकास मेस्त्री (वेंगुर्ले शाळा नं. 3), तृतीय चिन्मय जगदीश किनळेकर (वेंगुर्ले शाळा नं. 4), आठवी ते दहावी गट- प्रथम- दीक्षा राजन पालकर (अणसुर-पाल हायस्कूल), द्वितीय- विष्णू उदय आरोलकर (दाभोली इंग्लिश स्कूल), तृतीय- विभागून मोहन रामचंद्र मालवणकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन, वेंगुर्ले) व गुंजन रघुनाथ कुडपकर (एम. आर. देसाई स्कूल), रस्सीखेच स्पर्धेतील विजेता संघ क्षेत्रपालेश्वर होडावडा तर उपविजेता संघ- सिध्देश्वर डाळकर, बेस्ट फ्रंट मेन- दिपक पार्सेकर (क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ) बेस्ट लास्ट मेन- दादा परब (सिध्देश्वर टाळकर `अ’ संघ) आदींना व्यासपिठारील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर राष्ट्रीय कबड्डाr स्पर्धेचे पंच म्हणून निवड झालेले जयेश राजन परब, राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झालेली कु. सानिया सुरेश आंगचेकर, कर्णबधीर असूनहि उत्कृष्ट चित्रकार असलेली पूजा रुपाची धुरी, कै. बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर, आरवली सोन्सुरे येथील प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार चंद्रकांत मेस्त्री त्याचप्रमाणे मंडळाच्या जबरदस्त मंडळाच्या कार्यक्रमासाठी स्टेज व मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टिम करणारे नयन डेकोरेटरचे चालक अण्णा आजगांवकर या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष संभाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिध्देश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळे, स्वाती पाटकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, यशवंत किनळेकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, निल नांदोडकर यांनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते काका सावंत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत जबरदस्त कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकारयांनी तर आभार अजित राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + one =