You are currently viewing जिल्हा परिषद अध्यक्षासह विषय समिती सभापतीनी दिला पदाचा राजीनामा

जिल्हा परिषद अध्यक्षासह विषय समिती सभापतीनी दिला पदाचा राजीनामा

नवीनांना संधी देण्यासाठी देण्यात आला राजीनामा

ओरोस

जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्यासह विषय समिती सभापतीं रविंद्र जठार, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे यानी पदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी राजीनामा दिलेला नसून त्यांच्याकडे प्रभारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षीय धोरणानुसार नवीनांना संधी देण्यासाठी या चारही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यानी प्रथम अध्यक्षा समिधा नाईक यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. तर अध्यक्षा सौ नाईक यानी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे राजीनामा दिला. उपाध्यक्ष म्हापसेकर यानी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत म्हापसेकर हे प्रभारी अध्यक्ष राहणार असून चारही सभापती पदांचा पदभार त्यांच्याकडे राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =