You are currently viewing सावंतवाडी शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत “हेल्मेट रॅली”…

सावंतवाडी शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत “हेल्मेट रॅली”…

सावंतवाडी

नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजण्यासाठी आज शहरात “रस्ता सुरक्षा अभियान” घेण्यात आले. दरम्यान हेल्मेटचे महत्व नागरिकांना समजले पाहिजे, तसेच लोकांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःचा जीव वाचवावा, या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली. या अभियानाच्या शुभारंभ श्री. काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहरात हेल्मेट रॅली ही काढण्यात आली.
यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेगडे, अधिकारी विजयकुमार अल्लम्मावार, अधिकारी जावेद शिखलगार, सचिन पोलादे, अभिजीत शिरगावकर, सुनील खंदारे, गणेश जाधव,प्रकाश गावडे,संदीप चव्हाण,वाहतूक पोलीस सुनील नाईक, राजा राणे, अभयकुमार मापसेकर, विल्सन,रुपेश रसाळ,आगा,जगदीश, राहुल राठोड, सुधीर पराडकर, गवंढळकर, नाईक,तावडे,धर्मेंद्र, सावंत,महादेव बामणे आदी उपस्थित होते.
यावेळी शहरात रस्ता सुरक्षा अभियानाची रॅली देखील काढण्यात आली. दरम्यान या रॅलीला महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सावंतवाडीत राबवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 11 =