You are currently viewing हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिरोडा वेळागर येथे स्वच्छता मोहीम….

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिरोडा वेळागर येथे स्वच्छता मोहीम….

सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा सहभाग

वेंगुर्ले

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी हातभार चारीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सावंतवाडी संस्थांच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या त्याने स्वतः हातभर चॅरिटेबल ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यां सोबत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. हातभार चॅरिटेबल ट्रस्ट ने मला अपल्या या कार्यक्रमात बोलवले आणि माझे स्वागत केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आज मला खूप आनंद झाला कारण हा माझा पहिलाच कार्यक्रम शिरोडा वेळागर येथे हातभार चॅरिटेबल ट्रस्ट च्या स्वच्छता मोहिमीतून झाला.त्यांचे मन साफ आहे.

त्याच्या ग्रुपमध्ये येऊन मला खूप आनंद झाला. मी आशा करते की आपण असे कार्यक्रम करूया आणि सिधुदुर्ग स्वच्छ करूया असे कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या हातभार चारिटेबल ट्रस्ट कॅन्सरग्रस्त, किडनी ग्रस्त, ब्रेन ट्यूमर, गरीब होतकरू विद्यार्थी तसेच दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी कार्य करत आहे.समाजसेवेची आवड असणार्यांनी या सामाजिक कार्यात हातभार चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये सहभागी व्हावे. तसेच दानशूर व्यक्तींनी या कार्यात मदत करावी असे आवाहन हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी यावेळी केले आहे. संपर्क :- 9404778585 / 9421391159 मदतीसाठी :- हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिधुदुर्ग A/c no.050400000007412 IFSC_SIDC0001050

यावेळी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, शिरोडा सरपंच – मनोज उगवेकर, हातभार चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, सं. खजिनदार नयनेश गावडे, सं. सचिव एकनाथ चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश राणे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद गावडे, जिल्हा म. सचिव अस्मिता भराडी, जिल्हा म. सल्लागार नम्रता आराबेकर, उपतालुका अध्यक्ष विनिता आराबेकर, तालुका संपर्क प्रमुख सुप्रिया आराबेकर, तालुका खजिनदार सायली देवरुखकर,पत्रकार मदन मुरकर, हातभार सदस्य मकरंद मेस्त्री,साईनाथ मेस्त्री,गुणाजी पाटेकर,महादेव मोरजकर,कु.निकीता दिलीप आराबेकर,राहुल डीचोलकर, प्रथमेश गावडे, दत्तप्रसाद गावडे, पुष्कर चव्हाण, दीक्षा कुबल, संकेत कुबल, जय कुबल, साहील शरद कोठावळे , सोहम कोठावळे, अनिकेत भराडी, शिरोडा ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावडे ,गजानन शिरोडकर, सद्गुरू पडवळ, सुनील रेडकर, उल्हास परब, संजय नार्वेकर, सचिन जाधव, आनंद शेट्ये आदी सहकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =