You are currently viewing मराठा समाज वधुवर मेळावा १ मे रोजी

मराठा समाज वधुवर मेळावा १ मे रोजी

सावंतवाडी

मराठा समाज बांधव संघटना सिंधुदुर्ग च्यावतीने कुडाळ येथे मराठा समाजाचा वधुवर मेळावा एक मे रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी तीन या वेळेत कुडाळेश्वर मंदिरनजीक बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी सदस्य अमरसेन सावंत, नागेंद्र परब यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी जिल्हा मराठा महिला अध्यक्षा प्रा. नीलम धुरी, सावंतवाडी महिला अध्यक्षा पूनम सावंत, ग्रामपंचायत माजी सदस्या दीप्ती कानडे, बॅ. नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सातपुते, व्यवस्थापक राजेंद्र तिरोडकर, मराठा समाज बांधव जिल्हाध्यक्ष सदाशिव सावंत, उपस्थित राहणार आहेत. यावेळी वधुवर आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे राजेंद्र तिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा