You are currently viewing गोड संक्रांत …

गोड संक्रांत …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गोड संक्रांत …*

सण आला हो संक्रांतीचा गोड
तिळगुळ करू या जोड ..

सण संक्रांतीचा मोठा
स्नेहात नको ना तोटा
स्निग्ध ते किती हो तिळ
गुळ अविट त्यातच गोड
गोडी वाढे तसे वाढवू प्रेम
करू चला थोडी तडजोड …

प्रेमात नको ती खोटी
हानीच तयाने मोठी
जग प्रेमावरती तरते
प्रेमाचे यावे भरते
सौहार्द असो विश्वास असो बिनतोड …

तिळगुळ मिलाफ हा साचा
स्नेह नि दृढ प्रेमाचा
हे बंध रेशमी बांधू
अन् मनमनांना सांधू
मनी नको तडे,अविश्वास
गुदमरे तयाने श्वास
रे मनुजा रे अहंभाव तू सोड ….
करू चला थोडी तडजोड….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ११ जानेवारी २०२३
वेळ : सकाळी ११

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =