You are currently viewing नियमांचे पालन करीत वेगावर नियंत्रण ठेवल्यास सुरक्षित प्रवास होतो

नियमांचे पालन करीत वेगावर नियंत्रण ठेवल्यास सुरक्षित प्रवास होतो

पत्रकार दयानंद मांगले यांचे देवगड आगार येथे प्रतिपादन

देवगड

प्रत्येक चालकाने वाहन चालवीत असताना वेगावर नियंत्रण ठेवावे.योग्य वेळी गिअर चा वापर करून वेग नियंत्रित करावा त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने वाहन ओलांडण्याचा अतिरेक टाळला .तर निश्चितपणे सुरक्षित सेवा पार पाडता येते.या साठी परिवहन विभागाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे आणि हा सुरक्षितता सप्ताह मर्यादित कालावधी साठी असला तरी आपली सेवा कायमस्वरूपी सुरक्षितपणे बजावावि असे आवाहन विशेष कार्यकारी अधिकारी तथा पत्रकार दयानंद मांगले यानी देवगड आगारात बोलताना केले.

रस्ता सुरक्षितता अभियान अंतर्गत कार्यक्रम देवगड आगारात पत्रकार दयानंद मांगले,यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला

कार्यक्रमात आगारातील चालकासह सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाहन चालविणे तसेच परिवहन विभागाच्या सूचनांचे पालन करणे वेळोवेळी रापम प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुचना पालन करणे, बाबत मार्गदर्शन त्यांनी केले*

या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकार, स. वा.निरीक्षक लहू सरवदे,आगार लेखाकार श्रीकांत शेळके,हेड मेस्त्री धाकु तांबे ,वरिष्ठ लिपिक कुंदा गोलतकर,,योगेश पांचाळ सह सर्व आगारातील पर्यवेक्षक ,यांत्रिक ,चालक वाहक उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरुखकर यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सुरक्षित वाहन चालविण्याचे चालकांनी प्रतिज्ञा घेऊन प्रतिज्ञापत्र लिखित घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा