राज्यात ५९ हजार ९०७ कोरोना रुग्ण

राज्यात ५९ हजार ९०७ कोरोना रुग्ण

राज्यात बुधवारी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढा राहिल्याचे दिसून आले. दिवसभरात ५९ हजार ९०७ रुग्णांचे निदान झाले, तर मागील २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ३२२ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख ७३ हजार १६२ झाली असून, बळींचा आकडा ५६ हजार ६५२ झाला आहे. राज्यात ५ लाख १ हजार ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दिवसभरात ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २६ लाख १३ हजार ६२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्के झाले असून, मृत्यूदर १.७९ टक्के आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा