नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; २४ तास निगराणीमुळे शस्त्रसाठा अधिक सुरक्षित
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भर घालत शस्त्रसाठा सुरक्षित व कार्यक्षम ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमास आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा कारागृहाच्या बाहेरील परिसरात उभारण्यात आलेले हे शस्त्रागार गार्डरुम अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्थांनी सुसज्ज असून ते २४ तास कडक निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे कारागृहातील शस्त्रसाठ्याचे सुरक्षित व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.
तसेच बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढविण्यास मदत होणार असून, संभाव्य धोक्यांना वेळीच प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे कारागृहाच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळून सुरक्षिततेचा दर्जा उंचावणार आहे.
