You are currently viewing दिव्यांग बांधवांच्या सेवेत भाजपा सदैव अग्रेसर- जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

दिव्यांग बांधवांच्या सेवेत भाजपा सदैव अग्रेसर- जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

*दिव्यांग बांधवांच्या सेवेत भाजपा सदैव अग्रेसर- जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने ” सेवा पंधरवडा ” कार्यक्रमाचा शुभारंभ*

*कोकण कला व शिक्षण विकास संस्था – अध्यक्ष दयानंद कुबल व विशाल परब मित्रमंडळ यांच्या वतीने दिंव्यांगांना गणेश साहित्य वाटप.*

समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे असे भाजपा सरकार केंद्रात आहे.अंत्योदयाच्या विचारधारेचा अंगीकार केलेली मंडळी आज भाजपाचे नेतृत्व करत आहेत.त्यामुळे समाजातील रंजल्या गंजल्या घटकांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे.जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सेवेत भाजपा सदैव अग्रेसर असेल असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.सेवा पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस भाजपा ‘सेवा पंधरवडा’ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करत आहे.
या अभियानाचा शुभारंभ दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याने करण्यात आला.याप्रसंगी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या तसेच त्यांच्या आयुष्यमान कार्ड,आरोग्य सेवा याबाबतीत नियोजन करण्यात आले.
कसाल येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आणि दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेशोत्सवानिमित्त भेटवस्तू , त्यांच्या विद्यार्थीदशेतील पाल्यांना मा पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून वह्या वाटप , घरकुल मंजूर झालेल्यांना शुभेच्छा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
यावेळी दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . तसेच भविष्यात दिंव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा च्या माध्यमातून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
यावेळी दिंव्यांग आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट , शासकिय प्रभारी प्रकाश वाघ , पाच टक्के निधी प्रभारी मनोज सातोसे , प्रकाश सावंत , बाबुराव गावडे , प्रशांत कदम तसेच बहुसंख्य दिंव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होते .

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा