You are currently viewing कुडाळ तालुक्यातील शोकाकुल कुटूंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ तालुक्यातील शोकाकुल कुटूंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ

वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील ऍड. सिद्धेश कुबल यांचे वडील कै. सदानंद काशिराम कुबल यांचे दुःखद निधन झाले.वेताळबांबर्डे राऊतटेंब येथील नंदकिशोर परब यांचे बंधू कै. सोमा उर्फ नाना परब यांचे दुःखद निधन झाले. स्वीय सहाय्यक तथा आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण यांचे वडील रमाकांत चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. त्याचबरोबर बिबवणे शाखाप्रमुख प्रसाद निर्गुण यांचे वडील माजी सैनिक सखाराम(नाना) निर्गुण यांचे दुःखद निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी काल त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुबल,परब चव्हाण व निर्गुण कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,शैलेश घाटकर,प्रदीप गावडे , पिंट्या दळवी, आनंद सामंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 17 =