You are currently viewing डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा..

डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा..

*कथ्थक विशारद समृद्धी चव्हाण हिची वंदे भारतम् नृत्य उत्सव दिल्ली येथे निवड*

 

मुंबई / डोंबिवली :

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या वंदे भारतम् नृत्य उत्सवाच्या दिल्ली परेडसाठी डोंबिवलीची एकलव्य आर्ट फाउंडेशनची शिष्या, कथ्थक विशारद समृद्धी चव्हाण हीची निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथ, इंडिया गेट येथे आयोजित महारॅलीमध्ये समृद्धी डोंबिवलीची कथ्थक नृत्य पताका फडकवणार आहे. विशेष म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित असणार आहेत. डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल समृद्धीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच या उत्सवासाठी व तिच्या पुढील वाटचालीस सर्व डोंबिवलीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eleven =