You are currently viewing धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रक्षेपण निर्बंध पाळा; अन्यथा कारवाई करावी लागेल

धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रक्षेपण निर्बंध पाळा; अन्यथा कारवाई करावी लागेल

पोलील निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे शांतता बैठकीत आवाहन

सावंतवाडी

सर्व धर्मीयांच्या पार्थना स्थळे किंवा विविध कार्यक्रमाच्या वेळी सर्वोच्च न्यायालय व शासनाने निर्देश केलेल्या आदेशाप्रमाणे ध्वनी प्रक्षेपण करण्यात यावे. ध्वनिप्रदूषण होणार नाही अशी खबरदारी घ्यावी अन्यथा कारवाई करावी लागेल असे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले.
सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेगडे यांनी ध्वनी प्रक्षेपण त्रास होऊ नये याची खबरदारी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे, विविध कार्यक्रम करताना घेतली जावी. त्याबाबत कोणत्याही तक्रारी होऊ नये म्हणून खबरदारी ही घेण्यात यावी असे निर्देश दिले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान तशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सर्व धर्मीय व शांतता समितीच्या सदस्यांनी याबाबत दक्षता घ्यावी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कोणी तक्रार करत असेल तर त्याची शाहनीशा पोलिसांनी करावी असे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक मेंगडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालय व शासनाचे आदेश या पार्श्वभूमीवर वेळोवेळी निघणाऱ्या आदेशांचे पालन केले जाते त्यामुळे सर्व धर्मियांनी त्याचे पालन केले पाहिजे.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सौ रेश्मा सावंत, गोविंद वाडकर, अँड नकुल पार्सेकर, हिदायतुल्ला खान व सदस्यांनी काही सूचना केल्या. तसेच शहरातील शाळा भरताना रस्त्यावर वाहतूक अडथळा निर्माण होतो याबाबत देखील शाळा व्यवस्थापना सोबत पोलिसांनी चर्चा करावी अशी सूचना सदस्यांनी मांडली.


यावेळी शांतता समितीचे सदस्य बबन साळगावकर,राजू बेग, गोविंद वाडकर,सौ रेश्मा सावंत, अँड नकुल पार्सेकर, सुरेश भोगटे , अभिमन्यू लोंढे, रवींद्र मडगावकर,हिदायतुल्ला खान,सौ अफरोज राजगुरू,आगोस्तीन फर्नांडिस, रफिक मेमन, शब्बीर शेख, फारुख गनी,नदीन दुर्वेश, कबीर शेख,मोहदीन शेख,चाॅद करोल, अल्ताफ मुल्ला व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा