मनसे देवली, आंबेरी, चिपी येथील शेतकरी ग्रामस्थांसोबत – मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर

मनसे देवली, आंबेरी, चिपी येथील शेतकरी ग्रामस्थांसोबत – मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर

वेळ प्रसंगी ग्रामस्थांना सोबत घेवून जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा….

मालवण
वाळूमाफिया रात्रंदिवस बेसुमार अवैध वाळूउपसा करत आहेत. कर्ली खाडीतील चिपी हद्दीतील खारबंधारा सुद्धा सततच्या वाळू उत्खननामुळे पूर्णपणे खचला आहे.वाळू उपशामूळे खाडीचे पात्र रुंद होत असून हे खारे पाणी शेतात, माडबागायतीत घुसून शेतकऱयांचे नुकसान होत आहे.याकडे देवली-वाघवणे,आंबेरी वाकवाडी आणि चिपी येथील शेतकरी,ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.पण मुजोर प्रशासन वाळू माफियासोबत असल्यासारखे वागत आहे.
प्रशासनाची मुजोरी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ग्रामस्थांसोबत राहणार असून वेळ प्रसंगी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला जाईल असे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
कर्ली खाडीमध्ये देवली-वाघवणे व आंबेरी-वाकवाडी (चिपी जुवा) बेट येथे वाळूची अक्षरश: लूट चाललेली आहे. नजीकच असलेल्या कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या कर्ली पुलापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर सुद्धा वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. (शासन धोरणानुसार पुलाच्या दोन्ही बाजूस 600 मीटर प्रतिबंधित क्षेत्र आहे.) त्यामुळे कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. देवली-वाघवणे येथे खाडीलगत 1800 मीटरचा खारबंधारा आहे.देवली-वाघवणे येथील ग्रामस्थांची घरे, शेतजमीन, माडबागायती यांचे अस्तित्वच या खारबंधाऱयावर अवलंबून आहे. अवैध आणि अतिरिक्त वाळू उत्खननामुळे सुमारे 600 मीटर खारबंधारा खचून गेला आहे. जर पूरस्थिती निर्माण झाली आणि खारबंधारा तुटला,तर ग्रामस्थ व शेतकऱयांची घरे, शेतजमीन,माडबागायती यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
हा सारा प्रकार स्थानिक जनतेला लोकांना विस्थापित तसेच उध्वस्त करणारा आहे.जो मनसे कदापीही खपवून घेणार नाही.असेही इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा