You are currently viewing चौके ग्रामपंचायतीमध्ये माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी…

चौके ग्रामपंचायतीमध्ये माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी…

मालवण

राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चौके ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमांना सरपंच श्री गोपाळ चौकेकर व उपसरपंच श्री. पी. के. चौकेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक श्री. नलावडे भाऊ, सदस्य दुलाजी चौकेकर, सौ. जयश्री कदम, सौ. अनिशा चौकेकर,सौ. विशाखा चौकेकर, कर्मचारी दीपक चौकेकर, गोपी मांजरेकर, मेघा वराडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच श्री. पी. के. चौकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
ग्रामसेवक श्री. नलावडे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + fifteen =