You are currently viewing दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक जखमी

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक जखमी

सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार व महेश पांचाळ यांनी  सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय केले दाखल

सावंतवाडी

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आकेरी येथील वीस वर्षीय युवक जखमी झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आंबोली मार्गावर कचरा डेपो परिसरात घडली. रोशन सदानंद नाईक, असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर तो जखमी अवस्थेत रस्त्यात पडला होता. यावेळी त्या मार्गावरून जाणारे सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार व महेश पांचाळ यांच्या हा प्रकार निदर्शनास पडताच त्यांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघाताची माहिती मिळतात त्याचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक आपल्या ताब्यातील दुचाकीने आकेरी येथून सांगेलीला आपल्या आजोळी जात होता. यावेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्याच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर बराच वेळ तो जखमी अवस्थेत रस्त्यात पडून होता. मात्र मदत करण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. अशातच त्या मार्गावरून जाणाऱ्या मणियार आणि पांचाळ यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेतून त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. तर अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − nine =